ग्रामपंचायत बद्दल
- मुख्यपृष्ठ
- ग्रामपंचायत बद्दल
ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत
ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत
ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत
ग्रामपंचायत ओटवणे या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत
ग्रामपंचायत बद्दल
ग्रामपंचायत ओटवणे (Grampanchayat Otavane)
ओटवणे ग्रामपंचायत ही सावंतवाडी तालुक्यातील एक कार्यक्षम व सुव्यवस्थित ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. ग्रामस्थांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभागातून निर्णय घेणे, पारदर्शक कारभार राखणे आणि गावाच्या गरजांनुसार विकासकामे राबवणे ही या ग्रामपंचायतीची प्रमुख कार्यपद्धती आहे.
ओटवणे गाव हे धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठीही ओळखले जाते. गावातील श्री देव रावलनाथ हे संपूर्ण परिसरात अत्यंत प्रसिद्ध देवस्थान असून ग्रामस्थांची श्रद्धा व आस्था याठिकाणी घट्ट रुजलेली आहे. वार्षिक जत्रा, उत्सव व धार्मिक विधी यामुळे गावात सामाजिक एकोपा व सांस्कृतिक एकात्मता जपली जाते. ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावाचा विकास, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर समतोल साधला जातो.
एकूण लोकसंख्या
0
स्त्रि लोकसंख्या
0
पुरुष लोकसंख्या
0
- स्थानिक ओळख:
ओटवणे ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वसलेली एक सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे. हे गाव आपल्या शांत परिसरासाठी आणि हिरवाईने नटलेल्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
- स्थानिक प्रशासन:
ओटवणे ग्रामपंचायत गावातील नागरीकांसाठी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि वीजपुरवठा अशा मुलभूत सुविधांचे व्यवस्थापन करते. गावातील सर्व नागरीकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत असते.
- शिक्षण:
ओटवणे गाव शिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध आहे. इथे एकूण चार प्राथमिक शाळा आहेत – शाळा नंबर १, शाळा नंबर २, शाळा नंबर ३ आणि शाळा नंबर ४. या शाळांमधून गावातील मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळते. तसेच विविध वाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्रेही आहेत, जे लहान बालकांच्या शिक्षण आणि पोषणाकडे लक्ष देतात.
- आरोग्य सेवा:
गावात जाधववाडी परिसरात एक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे, जे गावकऱ्यांना मूलभूत आरोग्यसेवा पुरवते. नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि आरोग्य शिबिरे इथे आयोजित केली जातात, ज्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते.
- सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम :
ग्रामपंचायत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहिमा, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रामोत्सव यांसारखे उपक्रम राबवते. या उपक्रमांमुळे गावातील एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी वाढते.
ओटवणे ग्रामपंचायत चे ध्येय आणि उद्दिष्ट
ओटवणे शिक्षित, समृद्ध आणि आरोग्यदायी ग्रामाचा अभिमान.
ओटवणे ग्रामपंचायतचे ध्येय
ओटवणे ग्रामपंचायतीचे ध्येय म्हणजे गावातील प्रत्येक नागरीकाला मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी प्रदान करणे. सर्वांना स्वच्छ पाणी, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा आणि शाश्वत विकासाचे मार्ग उपलब्ध करून देत, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. एक सुसज्ज, स्वच्छ, साक्षर आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ओटवणे ग्रामपंचायतचे उद्दिष्ट
ओटवणे ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्वांगीण विकासाला चालना देणे. यात शेती, पाणी व्यवस्थापन, शिक्षणाची सुधारणा, आरोग्य सुविधा वाढवणे आणि सामाजिक सलोखा राखणे यावर भर आहे. गावातील प्रत्येक वस्तीपर्यंत हे सर्व उपक्रम पोचवून, एक आदर्श आणि सर्वसमावेशक ग्रामव्यवस्था उभी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.